कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने, असा ५४ हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार बार्शीतील भिसे प्लॉट भागात घडला.
बार्शी- बंद घराचा कडीकोयंडा तोडून ५४ हजारांचा ऐवज लंपास
संजय भगवानराव बौंदर (वय ४३, रा. भिसे प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या मेहण्यांचे नाशिक येथे लग्न असल्याने ते व घरातील सर्वजण घरास कुलूप लावून गेले होते. रात्री नाशिक येथून लग्नकार्य करुन घरी बार्शी येथेआले असता घराचा कडीकोयंडा तोडलेला दिसला व घराचा दरवजा उघडा होता. त्यामुळे त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे समजले. यामध्ये रोख १० हजार व लहान मुलीच्या सोन्याच्या अंगठ्या, बदाम, काळ्या मण्याचे गंठण, अशी ५४ हजारांची चोरी झाली. याबावत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.