बार्शी : बार्शी तालुक्यात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, चोरट्याने बार्शी येथील न्यायालयाच्या आवारातून चक्क वकिलाचीच दुचाकी चोरली आहे. या प्रकरणी ऍड.अभिजित जालिंदर जगताप (वय २३,रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे.
ऍड.जगताप यांनी न्यायालयाच्या आवारात सकाळी दुचाकी (एच.एफ. डीलक्स-एम.एच.१३ डीबी १६७४) लावली होती. ते कामानिमित्ताने न्यायालयात गेले. १२.३० वा. परत आले. तेथे दुचाकी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बार्शी शहरासह इतर ठिकाणीशोध घेतला. परंतु गाडी मिळून आली नाही. तपास हवालदार रूपेश शेलार करीत आहेत.