कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कुर्डूवाडी येथून कामकाज उरकुन गावाकडे जाताना वाटेत थांबलेल्या कारमधून दागिन्याची बॅग व मोबाईल असा १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्याने हातोहात लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील खांडवी शिवारातील एका हाॅटेल समोर घडला.
खांडवीत गाडीतून दीड लाखाची चोरी
प्रदिप जमादार वय (२८ वर्षे) रा. कोंड ता. जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी कुर्डूवाडी येथून कागदपत्राचे कामकाज उरकून सायंकाळी गावी परतत होते. शेंद्री गावाच्या पूढे खांडवी शिवारात आल्यानंतर तहान लागल्याने रोडच्या कडेला हॉटेलच्या समोर थांबले. ते काच बंद न करता गेले. चोरट्यांनी १५ हजाराचा एक मोबाईल, ३० हजाराची एक तोळाची अंगठी, १५ हजाराची अर्धा तोळा अंगठी, असा दीड लाखाचा मुद्देमाल चोरला आहे.