fbpx

कुतूहलच्या नावातच आकर्षण आहे- राजा माने

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: कुतूहलच्या नावातच आकर्षण आहे असे मत जेष्ठ संपादक राजा माने यांनी व्यक्त केले. कुतूहलच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह मध्ये आयोजित कुतूहल पुरस्कार २०२१ या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी बार्शीचे नाव देशाच्या नकाशात उंचावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव नक्कीच दिशादर्शक आणि कौतुकास्पद आहे. पंचायत समिती बार्शीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत म्हणाले, पुरस्कार विजेत्यांच्या प्रती कृज्ञतता व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित राहिलो. कोरोना काळात सर्वांनी आपली उत्तमरित्या कामिगरी पार पाडली. स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे म्हणाले की, पुरस्कार देऊन एखाद्याच्या सन्मान करण्यासाठी मोठे मन लागते सातत्याने कुतूहल परिवार हे काम करत आहे. पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर संजय अंधारे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीमध्ये माणसातील माणुसकी जिवंत आणि ज्वलंत झाली नाही तर माणसाने जगावं कसं हे देखील शिकायला मिळालं. आपल्या पुरस्कारामुळे आम्हाला जनसेवा करण्याची आणखी ताकद आणि ऊर्जा मिळाली. जयशिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत म्हणाले, या पुरस्कारने आमची जिम्मेदारी वाढली असून येणाऱ्या काळात अजून ताकदीने सामाजिक काम केले जाईल.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, ॲड.अनिल पाटील, गणेश गोडसे, विष्णू पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास जगदाळे, सूत्रसंचालन रजनी पाटील तर कार्यक्रमाचे आभार संपादक इरशाद शेख यांनी मानले.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी, धीरज शेळके, अजय पाटील, असिफ मुलाणी, निलेश झिंगाडे यांच्यासह कुतूहलच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

कुतूहल पुरस्कार २०२१ चे विजेते
शैक्षणिक :- रणजितसिंह डिसले, (ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते)

वैद्यकीय :– डॉ. संजय अंधारे, (सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी)

सामाजिक :- विजय राऊत, (जय शिवराय प्रतिष्ठान, बार्शी)

उद्योजक :-प्रशांत पैकेकर, (पैकेकर कंस्ट्रक्शन)

प्रशासकीय :- सुधीर तोरडमल, (सहा. पोलीस निरीक्षक, पांगरी पोलीस ठाणे)

प्रशासकीय :-शिवाजी जायपत्रे, (सहा. पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे)

बैंकिंग :-प्रमोद गलांडे, (व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, पांगरी शाखा )

सहकार :- वशिष्ठ गोरे, (चेअरमन, श्री माऊली नागरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या. बार्शी) यांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *