कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: लोक न्यायालयामध्ये झालेल्या तडजोडीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मिळकतीच्या हक्कपत्रकी संबंधित नोंदी घेणे आवश्यक होते. परंतु शेतजमिनीच्या वाटपाच्या तडजोडी ज्या लोक न्यायालयामध्ये होतात व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदीसाठी दिल्या जात होत्या तेव्हा संबंधित मंडल अधिकारी व तलाठी हे त्याचेवर आक्षेप घेवून नोंदीचे मुद्रांक शुल्क भरले नसल्याने नोंदी लावत नव्हते. आमदार राजेंद्र राऊत यांनी तहसीदार यांना पत्र देऊन नोंदी घेण्याची मागणी केली. त्यानुसार तहसीदारांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना नोंदी घेणाच्या सूचना दिल्या आहेत.
न्यायालयीन वाटप तडजोडीच्या हुकुमनाम्याच्या होणार नोंदी; आमदार राऊत यांच्या पत्राची दखल
ही तक्रार गेली तीन ते चार वर्षे चालु होती सदर तक्रारीचा पाठपुरावा यापुर्वी बार्शी वकिल संघाने वेळोवेळी केला. प्रसंगी वकिलांनी तहसिल कार्यालय बार्शी यांचेसमोर उपोषणही केले. लोक न्यायालयाचा उद्देशच हा होता की शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चात त्यांचे मिळकतीचे वाटप होवून त्यांचे रितसर हक्कपत्रकी नोंदी व्हाव्यात परंतु महसुल अधिकाऱ्यांच्या नोंदणी शुल्क भरल्याशिवाय नोंदी न घेण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते. व त्याचा खर्च पेलवत नसल्याने लोक न्यायालयातही तडजोडी होत नव्हत्या. पर्यायाने लोक न्यायालयाचा उद्देश सफल होत नव्हता. ही बाब वकिल संघाने आमदार राजेंद्र राऊत यांचे लक्षात आणुन दिली व तसे निवेदनही दिले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे बार्शी वकिल संघातर्फे आमदार राऊत यांचा बार्शी बार असोशिएशन येथे सत्कार करण्यात आला.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount