कुतूहल न्यूज नेटवर्क
जगात स्मार्टफोन्सचे काय महत्व आहे हे काय सांगायची गरज नाही. जवढे जास्त फीचर्स तेवढीच त्याची किंमत पण आज आपण फक्त २० हजारांच्या किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्ये असणारे फोन पाहणार आहोत. ज्यांचे वैशिष्ट्य आणि स्पेसिफिकेशन्स बर्याच महाग फोनसारखे आहेत. आम्ही अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल माहिती देत आहो आम्ही ज्यांची किंमत २० हजार रुपयांची असेल. चला तर मग जाणून घेवूया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स.
टॉप-५ स्मार्टफोन्स, फीचर्सही जबरदस्त, किंमत २० हजारपेक्षा कमी
Realme Narzo 30 Pro
या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी पॅनेल फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८०० यू एसओसी देण्यात आली आहे. साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याची बॅटरी ५००० mAH असून फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. याची किंमत १५,९९९ रुपये आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
POCO M3
Poco X3 मध्ये ६. ६७ इंच आकाराचा डिस्प्ले असून ज्याचं रिझोल्युशन २४०० x १०८० पिक्सल आहे. या फोनमध्ये ६ रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवलं जाऊ शकते. फोनमध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याची किंमत १५.३९९ रुपये आहे.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Vivo V20se
या फोनमध्ये ६.४० इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले असून १०८०x२४०० पिक्सल रेजॉलूशन आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा बोकेहा लेन्सर दिला आहे. तसेच याची बॅटरी ४,१०० mAh असून फोनची किंमत १९,९९० रुपये आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Realme 8 pro
या रियलमी फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस (२४००x१०८० पिक्सल) सुपर एमोलेड फुलस्क्रीन आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर सोबत ग्राफिक्स साठी एड्रेनो ६१८ जीपीयूचा आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ४५,०० एमएच बॅटरी देण्यात आली असून किंमत १८,६९० रुपये आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Samsung Galaxy M 51
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर आहे. यात ६.७ इंचाचा सामोलेड प्लस एफएचडी + डिस्प्ले आहे. हा फोन फास्ट चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल, १२ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा बॅटरी बॅकप चांगला असून याची बॅटरी ७००० mAh आहे. फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.