fbpx

ट्रॉन्सफार्मरमधील ५०० लिटर ऑईलवर चोरट्याने केला हात साफ

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी हद्दीत चोरीचा हा प्रकार घडला असून एमआयडिसी मधील महावितरणच्या दोन ( रोहीत्र ) ट्रॉन्सफार्मर ४० हजार किंमतीचे ५०० लिटर ऑईल काढून चोरट्याने पळविल्याची तक्रार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली. याबाबत संदिप भगवान शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

शिंदे यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, स्वतः शिंदे यांचेकडे भोयरे ,ताडसाैंदणे व गाताचीवाडी या तीन गावांचा महावितरणच्या लाईनचे देखभाल दुरुस्तीचे काम आहे. दि. ९ डिसेंबर रोजी सदर दोन रोहित्र तपासले असता ते सुस्थितीत होते.

मात्र एक आठवड्यानंतर दि १६ डिसेंबर रोजी पाहिले असता १०० केव्हीच्या रोहीत्रातुन खाली जामिनीवर ऑईल सांडलेले दिसले व वर चढुन पाहीले असता दोन्ही रोहित्राचे वॉल लूज व नट बोल्ट काढुन ऑईल नेल्याचे दिसल्याचे म्हटले आहे. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *