कुतूहल न्यूज नेटवर्क
पंढरपूर: विजयकुमार मोटे
आषाढी एकादशी यात्रेनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकरी केशव शिवदास कोलते (७१) व इंदुबाई केशव कोलते (६६) यांना विठ्ठलाची महापुजा करण्याचा मान मिळाला आहे. विठ्ठलाची शासकीय महापूजा येत्या 20 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक करणार आहेत.
हे दांपत्य करणार मुख्यमंत्र्यांसोबत विठूरायाची महापूजा
केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. पंढरपूर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मानाचा वारकरी म्हणून त्यांची निवड केली आहे.