कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे गावरान सिताफळाचे बी चोरी करणाऱ्या गावातीलच तीन संशयित चोरांना पांगरी पोलीसांनी अटक केली. सागर आनंदराव खळदकर (वय ३१ वर्षे), हणुमंत साधु शिंदे (वय २७ वर्षे) व सागर संजय झोरी (वय २६ वर्षे) तिघेही रा.गोरमाळे ता.बार्शी अशी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्यांना बार्शी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोरमाळे येथील नितीन गिराम रा गोरमाळे ता बार्शी यांनी बी चोरीबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीच्या शेतातील ३२ हजार रुपयांचे बी चोरून नेले होते. सिताफळाच्या बीया चोरीस गेलेबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास हवालदार दिपक परबत यांचेकडे देण्यात आला होता. त्यानंतर स.पो.नि.तोरडमल यांचे मार्गदर्शनाखाली दिपक परबत, मनोज जाधव, पांडुरंग मुंढे, विनोद बांगर, सुनिल बोदमवाड, उमेश कोळी, दिगांबर भंडारवाड यांनी गोरमाळे गावात व परिसरामध्ये तपास चालु केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढूण अशा प्रकारची चोरी करणारे आरोपी यांचा शोध घेतला असता गोरमाळे गावातील तिघे अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे समजल्याने त्यांना तात्काळ चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे सखोत तपास केला असता त्यांने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले.
त्यानंतर त्यांना तपासीक अंमलदार दिपक परबत यांनी सदर गुन्ह्यामध्ये अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता कोर्टानी आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडी दरम्यान गुन्हया तील चोरीस गेलेला मुद्देमाल याबाबत त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी ज्या ठिकाणी चोरी केली त्या ठिकाणापासुन थोडया अंतरावरच कडब्याच्या गंजीत सिताफळाच्या बीयाचे चार कट्टे लपवुन ठेवले असल्याचे सांगितल्याने ते जप्त करण्यात आले.व सदर गुन्हयात वापरण्यात आलेल्या दोन मोटार सायकल ही जप्त करण्यात आल्या. असा एकुण १,२२,००० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपीने आणखी कोठे कोठे चोरी केली आहे याचा अधिक तपास व त्यांच्या इतर साथीदार यांचा शोध पांगरी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सुधीर तोरडमल यांनी केली.