कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: ग्रामपंचायत व तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी सुचविलेल्या विकास कामांकरीता बार्शी तालुक्यातील ६३ गावांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील ६३ गावांसाठी पावणे तीन कोटी : आमदार राजेंद्र राऊत
तालुक्यातील सर्जापूर, इर्ले, कव्हे, मुंगशी आर, ढोराळे, सदाशिव नगर, मांडेगांव, आंबेगाव, इर्लेवाडी, धामणगाव दु. घारी, तडवळे, सावरगांव, उपळाई ठों, बाभळगांव, साकत, भान्सळे, चुंब, यावली, भोयरे, आगळगांव, लाडोळे, देवगांव, राळेरास, हळदुगे, कोरफळे, सासुरे, गौडगांव, नारी, कापसी, संगमनेर, खांडवी, पिंपरी आर, ज्योतिबाची वाडी, तुर्क पिंपरी, गुळपोळी आदी ६३ गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. दलित वस्त्यांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक रस्ता करणे, पाणी पुरवठा सोय करणे, नवीन गटार बांधकाम, नवीन बंदिस्त गटार बांधणे, समाज मंदिर बांधणे, आरो प्लांटची उभारणी करणे, स्मशानभूमी पोहोच रस्ता आदी प्रकारची विकास कामे करण्यात येणार आहेत.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले, जि.प. माजी सदस्य संतोष निंबाळकर, मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, इंद्रजीत चिकणे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.
(Three crore for 63 villages in Barshi taluka declared MLA Rajendra Raut)