कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे ग्रामीण रुग्णालय बार्शी तर्फे आयोजित तंबाखूमुक्त शाळा म्हणजेच व्यसनमुक्त शाळा याविषयीचे मार्गदर्शन मच्छिंद्र लोंढे यांचे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड हे होते. (Tobacco Free Workshop at Shankarrao Nimbalkar Teachers School)

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार तसेच नियमानुसार प्रत्येक शाळा व शाळा परिसर हा तंबाखू मुक्त व्हावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळांमधून केले जाते. हाच उपक्रम शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय मध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उलभगत यांनी मांडले. यानंतर ग्रामीण रुग्णालयातर्फे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे मच्छिंद्र लोंढे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त शाळा या उपक्रमाविषयी चे मार्गदर्शन केले. बार्शी ग्रामीण रुग्णालयातर्फे लोकांना कोणत्या सुविधा मोफत देण्यात येतात याविषयीची देखील मार्गदर्शन केले.
यामध्ये मोफत लस तसेच एचआयव्ही संदर्भातील औषध उपचार व मार्गदर्शन त्याचबरोबर विविध आजारांबाबत मार्गदर्शन तसेच व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन असे विविध उपक्रम ग्रामीण रुग्णालयातर्फे चालवले जातात. या विषयाचे सखोल मार्गदर्शन लोंढे यांनी केले. त्याच बरोबर तंबाखू मुक्त शाळा व परिसर या उपक्रमांतर्गत त्यांनी अध्यापक विद्यालयास एक ट्रॉफी भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी तंबाखू मुक्त शाळा या उपक्रमाविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व या उपक्रमाचे महत्त्व भावी शिक्षकांना व्हावे तसेच भावी शिक्षकांनी देखील समाजात याबद्दल जनजागृती करावी यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळेच अशा कार्यक्रमांचे आयोजन विद्यालयात केले जाते हे देखील नमूद केले. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्रा. डॉ. उलभगत यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक उपस्थित होते.