कुतूहल न्यूज नेटवर्क
वैराग , उजनी, मुरुड भागातील व्यापारी व शेतकरी आर्थिक संकटात- राहुल भड
बार्शी: तुळजापूर शहरातील दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार तुळजापूर नगरपालिकेने बुधवारी भरण्याचे ठरवले आहे. तुळजाभवानीचा वारही मंगळावर असल्याने या दिवशी शहरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. तुळजापूर नगरपालिकेने मंगळवारी शहरात गर्दीचे कारण पुढे करून आठवडी बाजाराचा निर्णय घेतला आहे. पण नगरपालिकेने व्यापारी व शेतकऱ्यांची गैरसोय न पाहता आठवडी बाजाराचा निर्णय घाई-गडबडीत घेतलेला आहे.
तुळजापूर पासून जवळच वैराग, उजनी आणि मुरुड या ठिकाणचे आठवडी बाजार बुधवारी भरले जातात. त्यामुळे या भागातील व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. तुळजापूर नगरपालिकेने आठवडी बाजार बुधवारी न भरविता गुरुवारी किंवा शनिवारी भरण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी राहुल भड, आबा कापसे, समाधान काळे, भीमाशंकर कोराळे, दत्ता बोधले, भगवंत माळी, रामलिंग गावणे, रमेश तानवडे, अमोल गावणे, विनायक चिपलगावकर, बशीर बागवान आदी बार्शी तालुक्यातील व धाराशिव जिल्हातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी तुळजापूर नगरपालिकेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.