बार्शी प्रतिनिधी,दि.६ डिसेंबर: सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर वाहतुक पोलिस सागर चोबे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आयशर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सागर चोबे हे बार्शी शहरातील अलिपुर रोड भागातील रहिवासी असून कर्तव्य बजावत असताना सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात हलवण्यात आला आहे.त्यांनी यापुर्वी पांगरी येथे सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ,पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.बार्शीत हळहळ व्यक्त केली जात आहे.