कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
सोलापूर : बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बार्शी शहर पोलिस ठाण्यातील सपोनी शिवाजी जायपत्रे, पांगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून अकलूज येथुन बदलुन आलेले सपोनी सुधीर तोरडमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनी राहुल देशपांडे यांची भंडारा येथे पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाची जागा रिक्त होती.पांगरीचे सपोनी सचिन हुंदळेकर यांचा पांगरी पोलिस ठाण्यातील कालावधी संपल्यामुळे त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.बदली झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्ती दिलेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी दिले आहेत.