कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
कृषी दिनानिमित्त जि.प.शाळा नातेपुते येथे वृक्षारोपण
नातेपुते (दि.१) : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाने कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहचे सात दिवस आयोजन केले आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगिक विकास व्हावा व त्यांना बदलत्या काळानुसार आपल्या शेतीत बदल व्हावा हा शासनाचा उद्देश आहे.
याचाच एक भाग म्हणून जि.प.प्रा. कन्या शाळा नातेपुते येथे आज उज्वल संचलित साधन केंद्र माळशिरस शाखा नातेपुते यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.याच वेळी जि.प.प्रा.शाळे मार्फत विद्यार्थ्यांना मोफत वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टंन्सिंग आणि सॅनिटायझर यांचा वापर करण्यात आला .
या कार्यक्रमात कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, शिक्षिका जाधव मॅडम, गोरे मॅडम, खिलारे मॅडम, दहिवाळ मॅडम उपस्थित होत्या. उज्वल लोकसंचलित साधन केंद्र नातेपुते नाजनीन काझी- खजिनदार ,श्री अमित एकळ -व्यवस्थापक, श्री मनोज जाधव- कृषी व्यवस्थापक ,श्री रणजीत फुले -पशु व्यवस्थापक, वर्षा धाईंजे- क्षेत्र समन्वयक, सौ. रेश्मा सप्ताले क्षेत्र समन्वयक( दहिगाव), सौ अश्विनी कुलकर्णी- लेखापाल ,सौ. मंगल सोरटे- समूह साधन व्यक्ती नातेपुते व महिला बचत गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.