fbpx

विवाह सोहळ्यातच राबविला वृक्षारोपनाचा उपक्रम

नेहमीच विविध उपक्रमात आघाडीवर असलेल्या कौठाळी गावात अनोखा उपक्रम

कुतूहल न्यूज नेटवर्क

पंढरपूर प्रतिनिधी ( विजयकुमार मोटे ) : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौठाळी तालुका पंढरपूर येथील धुमाळ परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करुन विवाह सोहळा पार पाडण्यात. आला शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून या अभियानाला प्रतिसाद देत नवविवाहित वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करून आगळा वेगळा विवाह सोहळा कौठाळी गावामध्ये पार पडला.कौठाळी येथील परमेश्वर नामदेव धुमाळ यांची कन्या स्नेहा व चिलाईवाडी येथील अभिमान धोंडीराम शेळके यांचे चिरंजीव दीपक यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टंसिंन चे पालन करत मोजक्या लोकांमध्ये पार पडला.

प्रारंभी दोन्ही वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या विवाह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सामाजिक अंतर ठेवत बँड डॉल्बी मंडप डिजे या सर्व गोष्टींना फाटा देत साधेपणाने हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला ह्यावेळी वधूवरांना व उपस्थित मोजक्याच लोकांना मास्क परिधान करून सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत हा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्यासाठी सरपंच शंकर गोडसे, माजी सरपंच महादेव गाढवे ,उपसरपंच नामदेव लेंडवे, माजी उपसरपंच अरुण धुमाळ, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ईश्वर धुमाळ, माजी सैनिक पांडुरंग धुमाळ, सोसायटी चेअरमन अरुण नागटिळक, शिवक्रांती परिवाराचे अध्यक्ष रामदास नागटिळक आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *