fbpx

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखर्डेत वृक्षारोपण

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखर्डे तालुका बार्शी येथे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, निरंजन  भूमकर, विक्रम सावळे, अभिषेक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी अमर पाटील यांनी वृक्षारोपण व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुप्रियाताई गुंड-पाटील, बार्शी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, जिल्हा सरचिटणीस अनिकेत पाटील, युनूस पठाण, चिखर्डे गावचे सरपंच प्रकाश पाटील, ग्रा.पं सदस्य संदेश देवकर, किरण मसेकर, राजेंद्र पाटील व आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस,  ग्रामस्थ उपस्थितीत होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *