कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात वृक्षारोपण
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यां बरोबरच गड किल्ल्यांवरील हिरव्या झाडांचा खूप मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला लाभला आहे. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करण्यासाठी डोंगर, दऱ्याखोऱ्यांसह जंगलांचा आधार घेतला होता. परंतु, वर्तमान स्थितीत गड व किल्ल्यावरील वृक्षांचे प्रमाण कमी होत आहे. तसेच पठारी भागात देखील वृक्षांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. परिणामी पर्यावरण संतुलन बिघडले आहे व ऐतिहासिक वस्तूंचा ऱ्हास होत आहे.

पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन व मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बिग्रेड पंढरपूर शहर कार्याध्यक्ष श्री. विश्वजीत भोसले यांच्यावतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम व परिसरामध्ये विविध ५० फळझाडांच्या रोपांची लागवड संभाजी बिग्रेडचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री. किरण घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण व विक्रम सिंह भोसले यांच्या हस्ते करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी, रोहित शिंदे, विशाल भोसले, विकी झेंड, सोपान देशमुख, सागर साळुंखे, बंटी वाघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे किशोर मोळक, सत्यम धुमाळ, भैया देशमुख व संघाचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.