बार्शी, दि.२७ :-बार्शी तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचार्यासाठी स्मार्ट अॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्रात दोन दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते. कर्मचार्यांना तानावाचे व्यवस्थापन (स्ट्रेस मनेजमेंट ),संभाषण कौशल्य व रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय आणि योजना यावर स्मार्ट अॅकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी मार्गदर्शन केले.
बार्शीत पोलिसांची स्मार्ट अॅकॅडमीत कार्यशाळा
दैनंदिन कामामुळे निर्माण होणारा तनाव कौटुंबिक पातळीवरही परिणाम करतो.सद्या सर्वच क्षेत्रात कामाची गती वाढली आहे त्यामुळे वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी मानसिक स्ट्रेस निर्माण होतो.या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दैनंदिन काम करताना ते सहजतेने करा,स्ट्रेस सर्वांनाच असतो,त्याचे मॅनेजमेंट करण्याचे कौशल्य अवगत करने महत्वाचे आहे,असे तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यावेळी म्हणाले.समारोपावेळी सहभागी पोलिस कर्मचार्यांनी या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली.