बार्शी प्रतिनिधी : बार्शी-लातूर रोडवर रिलायन्स कंपनी जवळ ट्रक व पिकअपचा अपघात आज गुरुवार दि.29 रोजी दुपारी अडीच च्या सुमारास झाला आहे.सुदैवाने या अपघात जीवित हानी झाली नाही.पिकअपच्या चालकाला किरकोळ जखम होऊन मुकामार लागला आहे. ट्रकचालकाने मद्यपान केले असल्याचा संशय बचावासाठी गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केला.ट्रकचे किरकोळ तर पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.