कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावरील वांगरवाडी फाट्यावरील एका हाॅटेलजळ ट्रकने छोटा हत्तीला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे छोटा हत्तीमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर बार्शीतील अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. छोटा हत्तीचा चालक आशिष सातारकर (रा. शितल हॉटेल जवळ जामगाव रोड बार्शी), व गणेश हरी काळे (रा. लातुर) अशी या भिषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याची नावे आहेत. पुनम पवार, रवि पवार, रंजना रवि पवार, कोमल पवार, निलम पवार, मनिषा पवार, अमोल बबन पवार, अमोल पवार सर्व रा. सोलापुर रोड पारधी कॅम्प बार्शी ता.बार्शी अशी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या छोटा हत्तीमधील लोकांची नावे आहेत. आश्राप्पा अचुत माळी रा. मुरुड ता.जि. लातुर असे अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
बार्शी – कुर्डूवाडी रस्त्यावर ट्रक व छोटा हत्तीचा अपघात; दोन ठार तर आठ जखमी
प्रताप जगताप (वय ४० ) रा. वांगरवाडी यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ते बार्शी येथील काम उरकून वांगरवाडी गावाकडे जात होते. त्यावेळी अचानक मोठा पाउस चालु झाला. त्यांना ट्रक कुर्डूवाडीकडे व छोटा हत्ती बार्शीकडे जाताना दिसला. अचानक मोठा आवाज ऐकु आला. तेवढ्यात कुर्डूवाडीडे जात असलेल्या ट्रक नं. एमएच ०८/ एच- २६२३ ची कुर्डूवाडी कडून येत असलेल्या छोट्टा हत्ती एम एच १४/जी.डी- ६४३३ या वहानास धडक लागुन अपघात होवून दोन्ही वहाने रोडच्या खाली जावुन थांबली. त्यांनी जावुन पाहिले त्यावेळी छोट्टा हत्ती वहानातील छोट्टा हत्ती वहान चालका सह सर्व लोक गंभिर जखमी झालेले दिसले व त्यातील छोटा हत्ती वहान चालक व अन्य एक इसम हे जागिच मयत झालेले दिसले. ईतर जखमींना बार्शीतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
ट्रक चालक आश्राप्पा माळी याचेवर अविचाराने, हायगईने, रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवून कुर्डूवाडी कडून येत असलेल्या छोट्टा हत्तीस समोरुन जोराची धडक देवून छोट्टा हत्ती वहानामधील लोकांना गंभिर जखमी करून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.