कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
पांगरी: येथील श्रीराम मंदिरात पौष महिन्यातील शेवटच्या रविवारचे औचित्य साधून ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लाडे यांनी हळदी-कुंकू, तिळगूळ व अकरा पैठणी साड्यांचा लकी ड्रॉ कार्यक्रम घेतला. सविता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बार्शीच्या माजी नगरसेविका विजयश्री पाटील, माजी सभापती कौशल्या माळी, मुख्याध्यापिका किरण बगाडे, उमेद अभियानच्या पंचशीला कसबे, कुमोदिनी जगदाळे, शारदा येडे उपस्थित होत्या.या स्पर्धेत सत्यभामा माळी, दीपाली घोडके, सारिका निंबाळकर, रेखा जगताप, तुळसा पौळ, पिंकी बगाडे , नीता सुरवसे, जयश्री कांबळे, मेघा मोरे, कोमल मुळे, शमा शेख या पैठणीच्या मानकरी ठरल्या.