fbpx

अपहरण केलेल्या मुलाची चोविस तासात सुटका; पोलीसांनी आरोपीला घेतले ताब्यात

कुतूहल न्यूज नेटवर्क
मोहोळ: मोहोळ तालुक्यातील अंकोली येथून अपहरण केलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची चोविस तासात सुटका करून मोहोळ पोलीसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. (Twenty-four hour release of abducted child; Police arrested the accused)

अमन शर्मा (वय ११ ) या मुलाची पोलीसांनी सुटका केली असून रूपकुमार उर्फ सोनू राम सिंह ओझा (वय २६,  रा. गाम मेहदा,  जिल्हा. भिंड मध्यप्रदेश) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी रूपकुमार याने अमनच्या वडिलांचा पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून अमनला अंकोली येथून अपहरण करून मध्यप्रदेशात घेवून गेला. आरोपीचे मोबाईल लोकेशन घेवून पोलीसांनी त्याला मध्यप्रदेशात जावून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाणचे पोलीस निरीक्षक अनोक सायकर, पोना. पाटील, पोकॉ. गणेश दळवी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *