कुतूहल न्यूज नेटवर्क
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीस अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सोलापूर : दि १२ डिसेंबर रोजी ट्रक चालक नवनाथ ज्ञानदेव सोनवले हे पुणे सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपले असता दोन अनोळखी इसमांनी गाडीच्या केबिनमध्ये घुसून त्यांना चकूचा धाक दाखवून पैसे मागतले.पण सोनवले यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर वार करून व गळा ओरखडुन जखमी केले होते. सदर घटनेबाबत ट्रक चालक सोनवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण कडील टीम करीत होती. स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांचे स्टाफने घटनास्थळास व फिर्यादीची भेट घेवुन गुन्हयाची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा दोन आरोपीनी केला असुन सदरचे दोन्ही आरोपी हे मित्रासोबत बाहेरगावी फिरण्यासाठी गेले आहेत व ते परतीच्या मार्गावर असताना नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापुर येथुन ०२ संशयीत आरोपीना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयांचे अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर दोन संशयीत आरोपीतांविरूद्ध पुणे ग्रामीण घटकातील भिगवण पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.
सदरची भरीव कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मुजावर,पोहवा/ राजेश गायकवाड, पोहवा/ नारायण गोलेकर, पोहवा/ धनाजी गाडे, पोहवा/ मोहन मनसावले, पोना/ रवी माने, पोना/ पांढरे, पोकॉ/ अक्षय दळवी, पोकॉ/ धनराज गायकवाड यांनी
सदरची कामगिरी बजावली आहे.