कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील कव्हे येथे उधारीचे पैसे मागितल्यामुळे दोघांना काठीने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. संतोष नागय्या गुत्तेदार तेलंग व त्याचा मित्र (नाव माहीत नाही) दोघे रा कव्हे ता. बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
बार्शी तालुक्यातील कव्हे येथे उधारीचे पैसे मागितल्याने दोघांना मारहाण
याबाबत जखमी आयशा फरिद शेख (वय ४०) रा. कव्हे ता. बार्शी यांनी फिर्याद दाखल केली आहे. गावातील संतोष नागय्या गुत्तेदार तेलंग याने वेळोवेळी फिर्यादीकडून उधारीवर मासे नेले होते. त्याचेकडे तीन हजार रुपये उधारी झाली होती. दि. २९ ऑगस्ट सायंकाळी साडे पाचचे सुमारास फिर्यादी मासेविक्री करीत असताना गावातील संतोष गुत्तेदार तेलंग हा त्याठिकाणी आला त्यावेळी त्यास उधारीचे पैसे मागीतले असता त्याचा राग आल्याने संतोष याने तेथेच पडलेली काठी फिर्यादीच्या पाठिवर मारली. तेवढ्यात तेथे फिर्यादीचे पती आले असता संतोष नागय्या गुत्तेदार तेलंग व त्याचा मित्र (नाव माहीत नाही) या दोघांनी काठीने पती फरिद शेख यांना मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीचे पतीच्या डोक्यास जखम झाली आहे. त्यानंतर ते शिवीगाळ करत तेथुन निघुन गेले.
जखमीवर ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे प्राथमिक उपचार करूण पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल उस्मानाबाद येथे पाठवले आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount