कुतूहल न्यूज नेटवर्क
नारीत निवडणूक मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी
पांगरी : निवडणूक मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन परस्पर विरोधी फिर्यादीवरूण दोन्ही गटातील तीस जणांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची घटना नारी ता.बार्शी येथे घडली आहे.
याबाबत आण्णासाहेब दत्तात्रय साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्यावेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनिल लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनिल कांबळे, गोकुळ सुनिल कांबळे सर्व राहणार नारी यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबला म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच अमोल रानमाळ,आण्णा शिंदे, अनिल बारंगुळे,सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ,आण्णा शिंदे यांना डोक्यात दगड घालून जखमी केले.
तर दुसरे फिर्यादी अनिल लक्ष्मण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. आज गावच्या निवडणुकीचे मतदान होते गावात निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफचे जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना गावातील रामचंद्र धर्मराज माळी याने मला तू दिवसभर इथे का थांबलास बाहेर जा म्हणल्याने आमच्या दोघात किरकोळ बाचाबाची झाली त्यावेळी अनिल भास्कर बारंगुळे, सुनिल भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ,अमित अरुण कदम,आण्णा शिंदे, सूरज मोरे,अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, आतुल नामदेव बदाले, बलबीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर,महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम सर्व राहणार नारी यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.या घटनेची पांगरी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.