दयानंद गौडगांव :कुतूहल न्यूज नेटवर्क
विहीरीमध्ये पडून मामा सह दोन भाच्यांचा मृत्यु
अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथे काल सायंकाळी च्या सुमारास एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली आहे.विहिरी मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन भाच्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या मामाचा ही विहरीमध्ये बुडून मृत्यु झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवराम मोतीराम गवळी (वय २६ रा बोरगाव दे ता अक्कलकोट), युवराज सुनील छत्रबंद (वय १४, रा सोलापूर) आणि आणि समर्थ बंडू धर्मसाले वय १६ रा माकणी ता लोहारा जिल्हा उस्मानाबाद अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. यातील युवराज छत्रबंद आणि समर्थ धर्मसाले हे आपल्या मामाकडे बोरगाव देशमुख येथे राहण्यासाठी आले होते. काल आपल्या मामाला सोबत घेऊन हे तिघेही शेताकडे गेले होते. मामाची नजर चुकवून शेतातील विहरी मध्ये हे दोघे भाचे पाण्यात पोहण्यासाठी उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले त्यांना वाचविण्यासाठी मामा शिवराम गवळी याने लगेच विहरीं मध्ये उडी टाकली असता ते ही खोल पाण्यात बुडुन मरण पावले.