fbpx

कळंबवाडी जि.प. शाळेस दोन स्मार्ट बोर्ड भेट

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: काटेगाव (ता.बार्शी ) येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९९९ बॅचच्या वतीने शिवजयंतीनिमित्त कळंबवाडी जि.प. शाळेस दोन स्मार्ट बोर्ड व शैक्षणिक साहित्य प्रदान केले. यापूर्वीही या बॅचने कोरेगाव येथील जि. प. शाळेस स्मार्ट टीव्ही, काटेगाव येथील विविध सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक देणगी तसेच गरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत केली असल्याचे सांगिलते. (Two smart boards gifts to Kalambwadi ZP school)

या बॅचमध्ये एकूण ७५ विद्यार्थी असून शालेय जीवनाच्या बावीस वर्षानंतरही आपापसातील प्रेम व मैत्रीपूर्ण व्यवहार जोपासणे, सुख दुःखाच्या प्रसंगी सामील होणे हे अतिशय कौतुकास्पद कार्य या बॅच कडून होत आहे. याप्रसंगी शिक्षक विलास थिटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पाटील, मन्मथ खराडे, अमोल उमाप, अमोल एडके, गणेश मुंढे यांच्या उपस्थितीत शरद येडके, अशोक नागरगोजे, संदीप पाटील यांचे हस्ते शाळेस भेट वस्तू देण्यात आली.

हा उपक्रम पार पाडण्यासाठी अशोक नागरगोजे, शरद येडके, दीपक काळे, विशाल गाढवे, रविकिरण पाटील, ज्ञानेश्वर धुमाळ, गणेश ढाकणे, सुशीला सुरवसे, सरिता कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *