fbpx

बार्शी तालुक्यातील दोन सुपुत्रांना शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील आगळगाव व टोणेवाडी येथील सुपुत्र व सध्या जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दोघांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.

आगळगांवचे सुपुत्र व लातूरचे शिक्षणाधिकारी औदुंबर संपतराव उकिरडे यांची पुणे शिक्षण उपसंचालकपदी व सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची पुणे येथे शिक्षण उपसंचालक अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे या पदावर शासन निर्णयानुसार पदोन्नती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *