कुतूहल न्यूज नेटवर्क
चिखर्डे अपघातात २ महिलांना चिरडलेल्या अज्ञात वाहनाचा “पांगरी” पोलिसांनी लावला छडा
पांगरी : चिखर्डे (ता.बार्शी) येथे माॅर्निग वाॅकला गेलेल्या दोन महिलास अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा पांगरी पोलीसांनी शोध घेत वाहन ताब्यात घेऊन चालकास अटक करण्यात आली.सागर संभाजी गोरे (वय २४ रा.चिखर्डे) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे.यात सुशिला महादेव पाचकवडे (वय ७०),महानंदा दत्तू कोंढारे(वय ६५ रा.दोघी चिखर्डे)असे अपघातात ठार झालेल्या महिलेची नावे आहेत.
याबाबत संतोष माधव पाचकवडे (वय ४० रा.चिखर्डे) यांनी पांगरी पोलीसात (ता.२७) अज्ञात वाहनाने धडक दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.त्यानंतर पांगरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश कोठावळे,सुरेश बिरकिले,सुनिल बोदमवाड,उमेश कोळी,गणेश घुले,पांडूरंग मुंढे या पथकाने घटनास्थळी अपघातात तुटून पडलेले कार गाडीचा पार्ट,त्याचबरोबर वाटसरूनी पाहिलेली गाडी,चिखर्डे,पांगरी,येडशी याठिकाणाचे गाडी गेल्याच्या दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून अपघातातील वाहन हे कार गाडी असल्याचे सिध्द झाले.कारचालक सागर संभाजी गोरे हे कार गाडी (एम.एच.४६ ए.यु.४९०९) घेऊन चिखर्डे-गोरमाळे रस्त्याने लोखंडी सावरगाव (जि.बीड)कडे गेले होते. यात पांगरी पोलीसांनी कार गाडी जप्त करून चालकासह अटक करण्यात आले.