कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले. त्यात उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण
‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असून आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. त्यांच्या कामगिरीला ४४ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून ४० टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला पसंती दर्शवली आहे.