कुतूहल न्यूज नेटवर्क
नवी दिल्लीः घटस्फोट प्रकरणी निर्णय देताना दिल्ली हायकोर्टाने समान नागरी कायद्याची आवश्यकता व्यक्त केली. भारत बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलिकडे जात आहेत. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे देशात समान नागरी कायदा लागू व्हायला हवा. घटनेचे कलम ४४ लागू करण्याची म्हणजेच समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता ती अपेक्षा न राहता लागू केले पाहिजे, असं न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह म्हणाल्या
समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आलीय: दिल्ली उच्च न्यायालय
एका घटस्फोटाच्या प्रकरणी सुनावणी करत असताना दिल्ली हायकोर्टाच्या न्यामूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी ही टिपणी केली. घटस्फोट प्रकरणाचा निकाल हा हिंदू विवाह कायद्यानुसार दिला जावा की मीना जमाती नियमानुसार, असा प्रश्न कोर्टासमोर उपस्थित झाला. पतीला हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट हवा आहे तर पत्नीला मीना जमातीतून येत असल्याने तिला हिंदू विवाह कायदा लागू होत नाही. यामुळे पतीने कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी पत्नी केली. तर पतीने पत्नीच्या या दाव्याविरोधात हायकोर्टात अर्ज अपील केला होता.
हायकोर्टाने पतीचा अपील स्वीकारत समान नागरी कायदा लागू करण्याची गरज व्यक्त केली. कायदे मंत्रालयाचा विचार घेण्यासाठी हे प्रकरण पाठवण्यात यावं, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.