कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
मळेगावात नर्मदेश्वर अन्नपूर्णा डिजिटल फलकाचे अनावरण
कारी दि. 31 ऑगस्ट : बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे श्री शिवाजी तरुण कला क्रिडा व बहुद्देशीय मंडळगावात सामाजिक उपक्रम राबवत असते. या मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनातुन गेल्या पाच महिन्यापासून चालू करण्यात आलेल्या नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेच्या डिजिटल फलकाचे अनावरण मळेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन शहाजी श्रीखंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या अन्नपूर्णा योजनेचा लाभ मळेगाव येथील25ते30 निराधार नागरिक घेतात.भविष्यात आजूबाजूच्या गावात ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न मंडळाचा आहे,असे अशोक माळी यांनी कुतूहल शी बोलताना सांगितले.
यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष गाभने, सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र बार्शी तालुकाध्यक्ष सागर शेळके, यशवंत गाडे, राहुल पावटे,जोतिराम वाघ आदी उपस्थित होते.