fbpx

UPSC- शेतमजुराच्या मुलाने दुसऱ्यांदा क्रॅक केली युपीएससी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यावेळी, आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. भूतकाळातील आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहान्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. शरणने आता दुसऱ्यांदा युपीएससी परीक्षा पास केली आहे. शरण कांबळेने २०२० च्या युपीएससी परीक्षेत ५४२ वी रँक घेत परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे, दुसऱ्यांदा युपीएसएसी परीक्षा पास होत त्याने इतिहास घडवला आहे. सैन्य दलातील सेवेतून शरण आता प्रशाकीय सेवेत जाणार आहेत, आएएस पदासाठी त्यांचे प्राधान्य आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *