fbpx

बार्शीतील ४५ पेक्षा कमी वयाच्या पत्रकारांचा फ्रंटलाईन वर्करमध्ये समावेश करून लसीकरण करा- पत्रकार गजशिव

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: बार्शी येथील पत्रकार प्रदिप ढाकणे-पाटील यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाल्यामुळे.बार्शीतील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक गजशिव यांनी बार्शीतील सर्व पत्रकारांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करून त्यांना कोरोनावरील लस देण्याची मागणी केली आहे. यावेळी गजशिव यांनी शासनाने पूर्वीच पत्रकारांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करून वयाची अट न ठेवता लसीकरण केले असते तर प्रमोद ढाकणे सारख्या तरुण उमद्या पत्रकाराचं कोरोनाने निधन झाले नसते. कोरोनाच्या काळात देखील पत्रकार ग्राउंड लेवलला काम करीत आहेत. प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या बैठकांना हजर राहून त्यांचे म्हणणे जनतेपर्यंत पाठवत आहेत. कोव्हिड हॉस्पिटल असतील, लसीकरण केंद्र असतील त्या ठिकाणी जाऊन जनतेला न्याय मिळावा यासाठी अहोरात्र झटत आहेत.

त्यामुळे बार्शी तालुक्यातील पत्रकारांना वयाची अट न ठेवता लसीकरण करण्याची मागणी गजशिव यांनी केली आहे. यावेळी मागणीचे पत्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्याकडे केली आहे, असे गजशिव यांनी कुतूहलशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *