कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: माहेर संंस्थेने वाघमारे वस्ती पेरणे फाटा (ता. हवेली) येथील लस न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांचे लसीविषयीचे गैरसमज दूर करून, जनजागृती करुन लस घेण्यास प्रोत्साहित केले. यावेळी ३०० लोकांनी लस टोचून घेतल्या. याप्रसंगी प्रतिक काळे, माहेर संस्थेचे अतुल शेळके, सुजय नायर, गायत्री निर्मळ, अनिता गायकवाड, पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे गायकवाड, लता मल्लाव, उषा वाळके, लता वाळके, आशिष कोतवाल, महेश झिरपे उपस्थित होते.
माहेर संंस्थेच्या पुढाकाराने पेरणे फाटा येथे लसीकरण
कोविड काळापासून आत्तापर्यंत माहेर संस्थेकडून आमच्या वस्तीसाठी विविध प्रकारच्या मदत मिळाल्या आहेत. या लसीकरणामुळे झोपडपट्टीमधील लसीकरणा पासून वंचित असलेल्या रहिवाश्यांना देखील लसीकरणबद्दल जनजागृती करुन लस देण्यात आली. प्रतिक काळे, सामाजिक कार्यकर्ते, पेरणे
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount