fbpx

बार्शी तालुक्यातील इंदापूर येथे १३० जणांचे लसीकरण

कुतूहल न्यूज नेटवर्क
मालवंडी : प्रतिभा पाटील
बार्शी तालुक्यातील इंदापूर येथे १३० जणांचे लसीकरण करण्यात आले. कोविडीची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अठरा वर्षाच्या पुढील सर्व तरुण, वयोवृद्ध,  महिला, पुरुष वर्गाणी लस घेतली. यावेळी भातंबरे आरोग्य उपकेंद्र अंतर्गत असणारे इंदापूर लसीकरण करण्यात आले. यावेळी भातंबरे आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी अंजुम शेख, आरोग्य सेविका वैशाली गर्जे, सुपरवायझर काळे, शिक्षिका गीड्डे,सरपंच शितल दराडे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष सारफळे, संगणक परिचालक प्रतिभा खरात, अंगणवाडी सेविका सविता घुगे, भीमराव दराडे, अर्जुन दराडे, किशोर घुगे, भाऊसाहेब कोरेकर आदी उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *