fbpx

पूर्ववैमनस्यातून वैराग येथे चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कुतूहल न्यूज नेटवर्क

वैराग : येथे मागील भांडणाचा राग मनात धरत हुंडा का दिला नाही व पत्नीला नांदवले नाही म्हणून मनात राग धरून एकास धारदार चाकूने जबर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे. ही मारहाणीची घटना वैराग-बार्शी हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुल अनिल शिंदे (रा. सारोळे, ता.बार्शी) असे जखमी इसमाचे नाव असून,सोलापूर येथील दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, तर अजय मुरलीधर भोसले,महेश मुरलीधर भोसले (दोघे रा.सासुरे, ता. बार्शी), शाहीर सतीश शिंदे व महादेवी शाहीर शिंदे (रा. ढोराळै,रोडवरील चौधरी ता. बार्शी) अशी चार संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नितीन अनिल शिंदे (रा. सारोळे) हे आपला भाऊ राहुल
यास आजारी असल्यामुळे येथील चौधरी हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी घेऊन आले होते.

यावेळी हुंडा दिलानाही, महादेवी हीस नांदविला नाही, याचा मनात रोष धरून वरील संशयित आरोपींनी राहुल यास चाकूने डोक्यात, पोटात, काखेत व पाठीवर वार करून जीवे ठार
प्रयत्न केला, अशी मारण्याची फिर्याद नितीन शिंदे यांनी वैराग
पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *