कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचा चांगल्याप्रकारे विकास करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सतत विविध योजनांमधून निधी मंजूर करून आणत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर भविष्यातही ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असून, त्याबाबतचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. (Vairag-Pangri-Ukkadgaon road repairs 5 cr rupee fund approved)
वैराग-पांगरी-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव -चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. लांबीचा रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
सदरचा ५ कोटी रुपयांचा निधी हा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१ – २०२२ अंतर्गत योजनेतर तरतूदी मधून रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमानुसार मंजूर करण्यात आला आहे.
सदरील रस्त्याचे काम व पुल दुरूस्ती मंजूर करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र शासनाशी सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी स्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती महाराष्ट्र शासनास केली होती.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, उपसभापती मंजुळाताई वाघमोडे, माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, पंचायत समिती सदस्य इंद्रजीत चिकणे, अविनाश मांजरे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.