fbpx

रांगोळी स्पर्धेत भूमच्या वैशाली जगताप झाल्या प्लॅटीनम विजेता, प्रगती फाउंडेशनचा उपक्रम

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मााबाद: आसिफ मुलाणी
प्रगती फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन आकर्षक रांगोळी स्पर्धेत भूमच्या वैशाली जगताप ठरल्या प्लॅटिनम विजेता. कोरोना व लाॅकडाऊन काळात घरात बसून महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी मुली व महिलासाठी प्रगती फाऊंङेशन ने आकर्षक रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात भूमच्या वैशाली जगताप यांनी ‘गाॅड सेव द अर्थ फ्राॅम कोरोना’ हि वास्तवीक संदेश देणारी रांगोळी काढली यात त्यांनी वास्तवाची सुरेख मांडणी केली. परिक्षक म्हणून चंचल अग्रवाल सहपरिक्षक म्हणून रोहिणी गोरे यांनी काम पाहिले तर सुत्रसंचालन दिपमाला जाधव यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाने मुली व महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल व या पुढेही भरपूर कार्यक्रम राबविले जातील असा विश्वास प्रगती फाऊंडेशनचे सर्वेसर्वा जी एम दिवटे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *