fbpx

बार्शी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वंदना भालशंकर

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वंदना भालशंकर तर उपाध्यक्षपदी अनिल पोफळे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडीची प्रक्रिया बार्शीतील संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या मासिक बैठकीत पार पडली. पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच चेअरमनपदी महिलाची निवड करण्यात आली. चेअरमनपदी वंदना भालशंकर व व्हाॅईस चेअरमनपदी अनिल पोफळे यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी संचालक संतोष शेळके, अनिल बारसकर, संतोष माने, पांडुरंग कागदे, सिराज शेख, पद्मराज जाधवर, मधुकर आगलावे, मंजुषा उगलमुगले, शोभा शिंदे,  बाळासाहेब झालटे उपस्थित होते. मावळते चेअरमन, व्हाॅईस चेअरमन यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाॅईस चेअरमन यांच्याकडे पदभार देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *