fbpx

Video-सोलापूरमध्ये पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद

कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पडळकर हे बुधवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांनी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठका घेतल्या. दुपारी भवानी पेठ येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पडळकर हे सायंकाळी या परिसरात आले. त्यांची गाडी मंदिराजवळ येताच गर्दीतून अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारला. हा दगड गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या काचेवर पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *