कुतूहल न्यूज नेटवर्क :
मानवता संयुक्त संघ्याच्या जिल्हाध्यक्ष पदी बार्शीचे पत्रकार विजय थोरात यांची निवड
बार्शी : विजेता टाईम्सचे मुख्यसंपादक विजय अंबादास थोरात (कोरे) यांचे 15 वर्षांचे सामाजिक काम पाहून त्यांची एक मताने सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी थोरात बोलताना म्हणाले की, समाजामध्ये सर्वसामान्य नागरिकासह पत्रकार तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याबाबत संघटीतपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाणार असून भ्रष्ट नोकरशाहिच्या विरोधात माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर यातून अंकूश ठेवला जाईल असेल विजय कोरे म्हणाले. सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्याआधी त्यांना त्यांच्या सत्विवेक जागा करून भ्रष्टाचाराचे सामाजिक व नैतिक नुकसान सांगितले जाईल, यानंतरही नाही सुधारणा झालीतर विरोधात तक्रार करुन, आंदोलन , उपोषण करू अशा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष विजय कोरे यांनी कुतूहल न्युज शी बोलताना दिला.