fbpx

पांगरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी वीरेंद्र गवळी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा कारभार डॉ. वीरेंद्र गवळी यांनी स्वीकारला असून, त्यांचे स्वागत ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार, पत्रकार इरशाद शेख, सुनील वाघमारे यांनी केले. याप्रसंगी डॉ. जयप्रकाश नंदन, नेत्र चिकित्सका प्रियंका खांडेलवाल यांचा ही सत्कार करण्यात आला.

नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवळी म्हणाले, बंद असलेली एक्सरे सेवासह इतर सेवा एक-एक करून लवकरच सुरु करून रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठीप्रयत्न करेन. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लागेल, एक टीम म्हणून काम केल्यास रुग्णांना आपण चांगली सेवा देऊ शकतो.

यावेळी वैद्यकीय कर्मचारी डॉ. संतोष जगदाळे, बाळासाहेब हराळे, दत्तात्रय जाधव, रुपेश जानराव, विष्णू जानराव, सुरक्षा कर्मचारी गणेश गायकी आदी उपस्थित होते.

(Virendra Gawli as Medical Superintendent of Pangri Rural Hospital)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *