fbpx

शिव व्याख्याते प्रा.विशाल गरड यांच्या ‘बुचाड’ ला मिळाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी: नॅशनल कमुनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल, तेलंगणा (आंध्रप्रदेश) मध्ये ‘बुचाड’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रा.विशाल गरड यांनी शेतकरी वेशात स्वीकारून अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केलाय.

दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख ‘बुचाड’ या लघुचित्रपटात मांडले आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न होता, स्क्रिनिंगच्या वेळेस सर्वांच्या डोळ्यात आलेले पाणी आणि ह्या मिळालेल्या पुरस्काराने ते अधोरेखित झालंय.

यावेळी गरड यांनी फिल्म फेस्टिव्हल मधील सर्व नामवंत परीक्षकांचे, बुचाड च्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या प्रत्येकाचे, इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टीमचे आभार मानले. तसेच  सोबत पुरस्कार प्राप्त झालेल्या सहविजेत्यांचे अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *