सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे (वय-९०) यांचे पुणे येथील हॉस्पिटलमध्येे मंगळवारी (२९ डिसेंबर) रात्री अकराच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक
विठोबा भरणे हे मागील महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवारआहे.
विठोबा भरणे हे प्रगतशील बागायतदार होते. ते इंदापूर तालुक्यात तात्या नावाने परिचित होते. ते सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे. आज बुधवारी ( ३० डिसेंबर ) सकाळी ११ वाजता भरणेवाडी या त्यांच्या मुळगावामध्ये त्यांच्यावर अंत्यसस्कार केले जाणार आहेत.