कुतूहल न्यूज नेटवर्क :
सोलापूर: सन 2020-21 मध्ये संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प करण्यात आली होती. सर्व व्यवसाय, धंदे, सर्व प्रकारची दुकाने, सर्व आस्थापना, कंपन्या, कामगारांचे काम सर्व वर्षभर बंद असल्यामुळे पालकांचं वर्षाचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले. कुटुंबाचा खर्च कसा भागवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे अशात सन 2020-21 मध्ये सिध्देश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळेने मुलांना शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी गेले असता गेल्यावर्षीची १०० टक्के फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही शाळेत ५० टक्के फी भरण्यास तयार आहोत, गेली २० दिवस प्रशासनाशी चर्चा करून ही फक्त १० टक्केवर फी सवलत दिली जाईल असे वर्ग शिक्षकांमार्फत कळविण्यात आले.
सिद्धेश्वर शाळेची ५० टक्के फी माफ करा; अन्यथा पालकांचा उपोषणाचा इशारा
प्रशासनाशी अनेक वेळा चर्चा केल्या पण अंतिम निर्णय घेतला गेला नाही आणि त्यानंतर मुलांना व्हाट्सअप ग्रुप मधून आणि ऑनलाइन क्लास मधून रिमूव करण्याची सूचना सर्व पालकांना देण्यात आली त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे असे पालकांचे मत आहे. सन २०२०-२१ची ५० टक्के फी भरण्यासाठी तयार असताना सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम शाळेचे प्रशासन ९० टक्के फी वसुलीवर ठाम आहे त्यामुळे चालू वर्षाची आणि गेल्या वर्षाचे असे मोठी रक्कम जमा करणे पालकांना आता शक्य नाही त्यामुळे गेल्या वर्षीचे ५० टक्के फी सवलत देऊन चालू वर्षाचे २ महिन्यानंतर ती घेण्यात यावी अशी पालकांनी विनंती केली असून केंद्र सरकार व राज्य सरकारचे फक्त शैक्षणिक शुल्क घ्यावे असे स्पष्ट आदेश निर्देश असताना सिद्धेश्वर शाळेने 90% फी वसुलीचे धोरण स्वीकारले आहे हे अन्यायकारक आहे. येत्या १० ते १५ दिवसांमध्ये यावर योग्य तोडगा नाही निघाल्यास सर्व पालक आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा अमर पोळ, मोहन वाघ, अर्चना पाटील, नितीन मेहन्द्रेकर या पालकांनी दिला आहे.