कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: वांगरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजाभाऊ राऊत गटाच्या १२ जागा बिनविरोध झाल्या असून, या सोसायटीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली वांगरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध
आमदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत सर्वसाधार गटातून शाहू साळुंखे, संजय तुपे, भारत काकडे, राजेंद्र तुपे, वाजीद पठाण, झुंजार घाडगे, सुधीर तुपे, तानाजी तुपे, महिला सर्वसाधारण गटातून स्वाती खडूळ, लतीकला जगताप, इतर मागासवर्गीय गटातून अभिमान शिंदे, अनुसूचित जाती जमाती गटातून दगडू लोखंडे हे बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचा, आमदार राजाभाऊ राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी रावसाहेब तुपे, भगवान घोलप, मनोज काळे, मंझूर पठाण, बळीराम तुपे, अनंत जगताप उपस्थित होते.
(Wangarwadi Various Executive Service Co-operative Society unopposed)