कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव
अक्कलकोट शहराला नऊ दिवसा आड पाणीपुरवठा
अक्कलकोट : गेल्या कित्येक वर्षांपासून अक्कलकोट तालुक्याला गंभीर स्वरूपात पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक नेत्यांकडून याची दखल घेतली गेलेली नाही.

सोलापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होऊन सुद्धा अक्कलकोट शहराला तब्बल नऊ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. जर ही परिस्थिती आणखीन थोडे दिवस अशीच राहिली तर शहराची स्थिती खूप बिकट होईल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाने पाण्याची टंचाई लवकरात लवकर दूर करावे अशी मागणी केली जात आहे.