कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे बागवान सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पांगरी ग्रामीण रुग्णालयाला व्हीलचेअर देण्यात आली.
शिवजयंती निमित्त बागवान सोशल फाउंडेशनतर्फे ग्रामीण रुग्णालयाला व्हीलचेअर भेट
यावेळी बागवान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर बागवान, ॲड. सुप्रिया गुंड- पाटील, ॲड. राज शेखर गुंड- पाटील, संगीता पवार, सुनंदा चव्हाण, अन्वर बागवान, बादशाह बागवान, साहिल बागवान, सुफियान बागवान, अधीक्षक डॉ. रवींद्र माळी, सचिन ठोंबरे, इरशाद शेख, पोलीस अंमलदार अर्जुन कापसे, अशपाक शेख, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.